Asia Cup 2018 : भारताला जबर धक्का,पंड्यासह आणखी दोन खेळाडू संघाबाहेर

टीम महाराष्ट्र देशा-भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आशिया चषकामधून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे पांड्याला संघाबाहेर जावे लागले आहे. आता त्यापाठोपाठ भारताला आणखी दोन धक्के बसले आहेत. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर या दोघांनाही स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंड्याला दुखापत झाली आहे. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली होती. त्याला बदली खेळाडू म्हणून दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. पंड्यासह अक्षर पटेल व शार्दूर ठाकूर यांनाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यांच्या जागी सिद्धार्थ कौल आणि रवींद्र जडेजा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

आयसीसीचे नेतृत्त्व केल्यानंतर पुणेकरांच्या मनातील खंत दूर झाली – शरद पवार

You might also like
Comments
Loading...