अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर अटकेत

crime-1

नवी मुंबई : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे – बिद्रे बेपत्ता प्रकरणी पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय कुरुंदकर यांना अटक केली. सदर कारवाई नवी मुंबई पोलिसांनी केली आहे. १५ एप्रिल २०१६ पासून अश्विनी कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही पोलीस तपासात टाळाटाळ करीत असल्याची तक्रार अश्विनी यांचे वडिल जयकुमार बिद्रे यांनी केली होती. अभय कुरुंदकर यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. अखेर पोलिसांनी ही कारवाई करत अभय कुरुंदकर यांना अटक केली आहे.

दरम्यान अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनी यांच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकांनी भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे उघड झाले होते.