किंग्ज इलेव्हनची साथ सोडून अश्विन संभाळणार ‘या’ संघाची धुरा

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून किंग्ज इलेव्हन पंजाब व दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये देवाण- घेवाण करारावर चर्चा सुरु होती. भारतीय संघाचा फिरकीपटू व आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन आश्विन 2020च्या आयपीएलच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार असल्याचे समोर आले आहे.

पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनीही आश्विनला दिल्ली संघाकडे देण्याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचं सांगितलं होतं. मात्र हा करार आता झाल्यामुळे आगामी हंगामापासून पंजाबची कर्णधारपदाची सुत्र लोकेश राहुलकडे जाण्याची शक्यता आहे.

या संर्दभातील दुजोरा किंग्ज इलेव्हन संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी दिला आहे.नेस वाडिया म्हणाले की, किंग्ज इलेव्हन पंजाबने अश्विनला रिलीज करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला संघात विकत घेण्यासाठी रुची दाखवली होती. तसेच इतर संघानेही अश्विनला आपल्या संघात घेण्याबाबत रस दाखवला असे त्यांनी सांगितले. यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे नेस वाडिया यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या