अश्विन पाठोपाठ युजवेंद्र चहलच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव ; वडील रुग्णालयात दाखल तर…

युजवेंद्र चहल

मुंबई : भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहालच्या कुटुंबावर कठीण परिस्थिती ओढावली आहे. युजवेंद्र चहालच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. आर अश्विन पाठोपाठ आता युजवेंद्र चहलच्या घरी देखील तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. युजवेंद्रच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. याची माहिती धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवरून दिली आहे.

दरम्यान, युजवेंद्र चहलच्या वडिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर आईवर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. युजवेंद्र आणि धनश्रीसाठी हा काळ किती कठीण आहे तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत धनश्री म्हणाली, ‘माझी आई आणि भाऊ दोघांनीही कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र मी माझ्या काकूला या आजारात गमवून बसले आहेत. आता माझे सासू-सासरे म्हणजे युजवेंद्रचे आई-बाबा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची गंभीर लक्षणं आढळून आल्यानं त्यांची चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली. तुम्ही घरीच राहा आणि काळजी घ्या’, असं कळकळीच देखील तिनं केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP