न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनकडे मोठा विक्रम करण्याची संधी 

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनकडे मोठा विक्रम करण्याची संधी 

ashwin

कानपूर : भारतीय क्रिकेट संघाचा  (Indian Cricket Team) ऑफ-स्पिन गोलंदाज रविचंद्रन अश्विन (R.Ashwin)  न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी करू शकतो. या सामन्यात अश्विन अनुभवी गोलंदाज हरभजन सिंगचा मोठा विक्रम मोडू शकतो.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जात असून तो कसोटीच्या नव्या हंगामाची सुरुवात आहे. या सामन्यात दोन्ही संघांना विजयाने सुरुवात करायची आहे. घरच्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर कानपूरमध्ये फिरकीला अनुकूल खेळपट्टी असू शकते, त्यामुळे अश्विनला आपल्या नावावर मोठा विक्रम करण्याची संधी असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

रविचंद्रन अश्विनच्या नावावर सध्या कसोटी सामन्यांमध्ये 413 विकेट्स आहेत. तो भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा चौथा गोलंदाज आहे. अश्विनने आणखी पाच विकेट घेतल्यास, तो हरभजन सिंगच्या मागे कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज बनेल. हरभजन सिंगच्या नावावर सध्या 417 विकेट्स आहेत आणि अश्विन त्याचा विक्रम मोडण्यापासून फक्त 5 विकेट्स दूर आहे.

भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम माजी दिग्गज कर्णधार अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने एकूण 619 विकेट घेतल्या. त्याचबरोबर विश्वचषक विजेता कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 434 बळी घेतले.

अश्विनबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत.

महत्वाच्या बातम्या