अश्विन ठरला कसोटीत ४०० बळी घेणारा ४ था भारतीय गोलंदाज; बीसीसीआयने केलं खास ट्विट

ashwin

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील आजचा दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये होणारी ही डे-नाईट कसोटी म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी खास पर्वणीच ठरली आहे.

या कसोटीत फिरकीपटूंचा बोलबाला दिसून आला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ११२ वर सर्वबाद झाल्यावर काल भारताने फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताला एका मागे एक धक्के बसत गेले. १४५ धावांमध्ये भारताचा संघ बाद झाला. यानंतर, इंग्लंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच षटकात अक्षर पटेलने दोन बळी घेत इंग्लंडला मोठा धक्का दिला.

यानंतर, आर. अश्विन च्या जोडीने अक्षरने इंग्लंडला सुरुंगच लावला. अवघ्या ८१ धावांवर इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळला. इंग्लंडच्या पहिल्या डावात आर. अश्विनने ३ बळी पटकावले होते. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला बाद करून कसोटीत ४०० बळींचा टप्पा गाठला. त्याच्याआधी भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (619), कपिल देव (434) आणि हरभजन सिंग (417) यांनी ही कामगिरी केली आहे. अश्विनच्या या विक्रमानंतर बीसीसीआयने देखील त्याचं खास कौतुक केलं आहे.

दुसऱ्या डावात अश्विनने ४ बळी घेतले. तर दोन्ही डाव मिळून या कसोटीत ७ बळी घेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दरम्यान, अश्विनने आर्चरच्या आधी बेन स्टोक्सला बाद करून 600 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

भारताचा शानदार विजय !

इंग्लंडने भारताला दिलेलं ४९ धावांचं लक्ष्य अगदी सहजपणे गाठलं आहे. बिनबाद ४९ धावा करत भारताने ही कसोटी मालिका आपल्या खिशात घातली आहे. दुसऱ्या दिवशीचं तिसरं सत्र सुरु झाल्यानंतर काही वेळातच हा विजय मिळवला. रोहित शर्मा ने २५ चेंडूंमध्ये २५ धावा तर शुबमन गिलने २१ चेंडूत १५ धावा केल्या. यामुळे भारताने १० विकेट्स राखून हा विजयश्री मिळवला. दरम्यान, या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या