आशुतोष यांचा राजीनामा या जन्मात तरी स्वीकारणार नाही – केजरीवाल

टीम महाराष्ट्र देशा – आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा स्विकारणार नसल्याचे म्हटले आहे. आशुतोष यांनी ट्विटरवरुन आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावर, अरविंद केजरीवाल यांनी आशुतोष यांच्या ट्विटला उत्तर देताना, ना, इस जनम मे तो नही.. असे ट्विट केले आहे. तसेच केजरीवाल यांनी दोघांचा एक फोटो शेअर करताना, सर हम सब आपको बहुत प्यार करते है, असेही म्हटले आहे.

आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच आशुतोष यांना राज्यसभेसाठी संधी न मिळाल्यामुळे ते नाराज होते . तर पक्षात त्यांनी घुसमट वाढली होती, त्यामुळेच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आशुतोष याचं स्पष्टीकरण

प्रत्येक प्रवासाचा कुठेतरी शेवट असतो, आपमधील माझे काम आणि सहकाऱ्यांशी संबंध शेवटपर्यंत अतिशय चांगले राहिले आहेत. मात्र, काही वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देत आहे.

मोदी सरकारकडून गिफ्ट,’राखी आणि गणेश मूर्तींवर जीएसटी नाही’