आशुतोषने अरुंधतीसमोर माझं तुझ्यावर प्रेम आहे….” ‘आई कुठे काय करते’..!

मुंबई : ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या खूपच चर्चेत आहेत. अरुंधती तिच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. जरी तिनं तिच्या आय़ुष्याला नव्याने सुरूवात केली असली तरी देशमुखांच्या घरातील मंडळी तिच्या पाठ सोडायला तयार नाहीत. आशुतोषनं अरुंधतीबद्दलची प्रेम भावना देशमुख कुटुंबासमोर बोलून दाखवल्याने तिच्याबद्दल सर्वांच्या मनात गैरसमज झाला आहे. आता एका नवीन प्रोमो समोर आला आहे.

या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर अरुंधती देखील आपल्या मनातल्या भावना मित्र आशुतोषसमोर बोलताना दिसत आहे. एका पोर्टलनं शेअर केलेल्या प्रोमोनुसार, आशुतोष अरुंधतीसमोर माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगताना दिसत आहे. पण मी हे सगळं देशमुख कुटुंबाच्या समोर बोलायला नको होतो. मात्र यावर अरुंधती त्याला म्हणते की, माझं आजपर्यंत अनिरुद्धवर प्रेम होतं आणि इतून पुढे पण त्याच्यावर राहिल. बाकी आपली मैत्री आणि एकत्र काम याबद्दल माझं काहीच मत नाही. त्यामुळे त्याहून जास्त मला गुंतता येणार नाही..असं म्हणत अरुंधती तिच्या मनातलं बोलून दाखवते. आता यानंतर आशुतोषच्या वागण्यात काय बदल होणार का, याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. यावेळी अनिरुद्धचा तिळापापड होतो. यानंतर सर्वांच्या मनात तिच्याविषयी चुकीचा समज होतो. या सगळ्याप्रकारानंतर अरुंधती तिच्या मुलगा यशसमोर माझ्या मनात असं काही नसल्याचे सांगताना दिसत आहे.

अरुंधीतनं आतापर्यंत अनेक अडचणींना तोंड दिलं आहे. आता खऱ्या अर्थाने तिचं जीवन आनंदात जगत आहे. आशुतोषमुळे तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्यामुळे आशुतोषसारखा व्यक्ती कधीही तिच्यासाठी योग्यच वाटतो पण अरुंधतीन त्याचं प्रेम नाकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या :