आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्र २ अंतर्गत पोखरापुर तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय

मोहोळ – तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्र २ अंतर्गत पोखरापुर तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय आणि त्यासंदर्भातचे अपुर्ण काम करण्याबाबत आज मंत्रालयामध्ये शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे हे स्वत : जलसंपदा मंत्री विजय बापु शिवतारे यांच्या दालनामध्ये पोखरापुर तलावामध्ये पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला, त्याबाबतचे सर्व आदेश जलसंपदाचे प्रधान सचिव यांना देण्यात आले.

सदरच्या कामासाठी संपर्क प्रमुख प्रा.आ.तानाजीराव सावंत सर, समन्वयक प्रा शिवाजी सावंत सर, जिल्हा प्रमुख गणेश ( दादा )वानकर यांनी याबाबत मार्गदर्शन केले होते त्याअनुशंगाने आज दि १६ फेब्रु रोजी शिवसेनेचे नेते तथा मा. जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये पाणी संघर्ष समीतीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या शिष्ठमंडळाबरोबर पोखरापुरच्या तलावा मध्ये पाणी सोडण्याचा निर्णय झाला.

या प्रसंगी तालुका प्रमुख अशोक भोसले,युवासेना उपजिल्हा प्रमुख महेश देशमुख, उपजिल्हा प्रमुख चरणराज चवरे, उपतालुका प्रमुख नागेश वनकळसे ( सर ), धनाजी पुजारी, आशिष आगलावे, महावीर आगलावे ,तेजस बोबडे, यांच्यासहित पाणी संघर्ष समीतीचे सदस्य पुष्कराज पाटील,विलास भोसले,रघुनाथ झांबरे आदी उपस्थित होते .