निलंग्यातून अशोकराव पाटील निलंगेकर यांचा पत्ता होणार कट ?

निलंगा/प्रा.प्रदीप मुरमे : मागील विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देवून नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याची घोषणा दस्तूरखुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केल्याने येथील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. परिणामी त्यांची उमेदवारी धोक्यात आल्याने सध्यातरी निलंगेकर समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे .
मागील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे अशोकराव पाटील यांना त्यांचे पुतणे भाजपचे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पराभूत केले होते.या पराभवातून स्वतःला सावरत अशोकराव पाटील मागील एक वर्षापासून पुन्हा नव्याने जोमाने कामाला लागले आहेत.आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध आंदोलने व जनसंपर्काच्या माध्यमातून ते कमालीचे सक्रीय झाले आहेत.

Loading...

सोशल मिडीया प्रमुख प्रा.गजेंद्र तरंगे यांच्यामुळे या मतदारसंघात सध्यातरी अशोकरावांचाच  बोलबाला आहे. नुकत्याच निलंगा येथे झालेल्या जनसंघर्ष याञे दरम्यान प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी अशोकराव निलंगेकर यांचे तोंडभरुन कौतुक केले.एवढेच नव्हे तर आगामी काळात जनतेंनी निलंगेकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.या सभेला झालेली तोबा गर्दी व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केलेली जाहीर स्तुती सुमने पाहता आगामी विधानसभा निवडणूकीची भैय्यांची उमेदवारी फायनल झाल्याची जोरदार चर्चा काँग्रेसच्या गोटातून ऐकावयास येत आहे.

जनसंघर्ष याञेची सभा यशस्वी झाल्यापासून निलंगेकर हे मोठ्या उत्साहाने मतदारसंघातील आपले दौरे व गाटीभेटीमध्ये वाढ केल्याचे दिसून येत आहे.केवळ गाटीभेटीच नव्हे तर अशोकभैय्यांचा भ्रमणध्वनीदेगील सदैव चालू असून सामान्य जनतेलाही भैय्या सहजपणे भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनदेखील उपलब्ध होत आहेत. लोकसभा व विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने निलंगेकर आपले ‘आमदारकी’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मतदारसंघात मोर्चेबांधणी करत चांगला संपर्क ठेवून आहेत.

या मतदारसंघातील राजकीय वर्तुळात देखील अशोकराव पाटील यांच्या या संपर्क मोहीमेची मोठी चर्चा आहे.अशोकराव मतदारसंघात जोरदार संपर्क साधून असल्यामुळे त्यांचे विरोधकही मतदारसंघात संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.परंतु सध्यातरी संपर्काबाबतीत अशोकराव हेच आघाडीवर आहेत.त्यामुळे काँग्रेसपक्ष व कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साह संचारला आहे.दरम्यान अकोट येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष याञे दरम्यान प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पराभूतांना आगामी विधानसभेची उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे वक्तव्य केल्याने अशोकराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये मोठी अस्वस्था पसरली आहे.या पार्श्वभूमीवर यांच्या उमेदवारीवरुन सध्यातरी उलटसुलट चर्चा ऐकावयास येत आहे,हे माञ निश्चित !

उदगिरात पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले !

निलंगेकरांच्या गडाला राष्ट्रवादी सुरुंग लावणार का ?

कॉंग्रेसचे आणखी दोन आमदार करणार भाजपमध्ये प्रवेशLoading…


Loading…

Loading...