विखे कुटुंबाचा संघर्ष चव्हाट्यावर , अशोक विखेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात त्यांचे मोठे बंधू डॉ. अशोक विखे यांनी बंड पुकारला आहे. अशोक विखे येत्या २० मे पासून विखे-पाटील कुटुंबाच्या विविध संस्थांच्या चौकशीच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार आहेत. मात्र, लोणी पोलिसांनी अशोक विखेंच्या उपोषणाला बसू नका अशी विनंती केली आहे. तर अशोक विखे यांनी याच पार्श्वभूमीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे जाऊन भेट घेतली आहे.

दरम्यान, येत्या २० तारखेपासून आपण उपोषण करू नये असे पत्र लोणी पोलिस ठाण्याने आपणास दिले आहे. राधाकृष्ण विखे यांनी मात्र परवानगी नाकरल्याची अफवा पसरवली, असा दावाही अशोक विखे यांनी केला आहे. आपण विविध संस्थांमधील गैरव्यवहारांबाबत माहिती दिल्यानंतर अण्णांनी खंत व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष करण्याचा सल्ला दिल्याचे विखे यांनी सांगितले.

डॉ. अशोक विखे-पाटील यांच्या नेमक्या काय आहेत मागण्या ?

गणेश, राहुरी, प्रवरानगर, या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळावेत.

झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची चौकशी करण्यात यावी.

जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकाराच्या तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई करावी.

मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी.Loading…
Loading...