सुरेश धसांचा जबरा फॅन, धस आमदार झाल्यावरच कपडे घालणार

बीड : माजी आमदार सुरेश धस यांना मानणारा मोठा वर्ग बीड जिल्ह्यात आहे. जनतेशी थेट संवाद आणि सामान्य जनतेत मिळून मिसळून राहण्याच्या त्यांच्या या गुणामुळे जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते धस यांच्या आजूबाजूला नेहमी पहायला मिळतात. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भुजबळ समर्थकांचे अनेक चेहरे पहायला मिळाले मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती भुजबळांच्या अटकेपासून दाढी न करणारा एक कार्यकर्त्याचे नाव सुनील पैठणकर . आज आपण सुरेश धस यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या भन्नाट कार्यकर्त्याविषयी जाणून घेणार आहोत.

माणुस आपल्या नेत्यावर किती प्रेम करु शकतो यांचे ताजे उदाहरण पहायचे झाले तर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मंगरुळ येथील अशोक तोडकर या ध्यवेडया कार्यकत्यांनी गेल्या चार वर्षांपासुन सुरेश धस जेव्हा आमदार होतील तेव्हाच अंगात शर्ट घालेल असा अनोखा पण केला आहे. हा पण येत्या विधान परिषद निवडणूकीत धस यांना विजय मिळाला तर पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

गेल्या चार वर्षापुर्वी सुरेश धस यांचा विधानसभा निवडणूकीत निसटला पराभव झाला तेव्हाच अशोक तोडकर यांनी जेव्हा सुरेश धस पुन्हा आमदार होतील तेव्हाच अंगात शर्ट घालेल असा पण केला आहे . धस यांना अशोक तोडकर इतके मानतात की ,त्यांनी थेट डाव्या बाजुच्या छातीवर अन उजव्या हातावर अण्णा अस नाव कोरले आहे.

सध्या सुरू असलेल्या लातुर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीत भाजपाकडुन सुरेश धस उभा आहेत आता धस यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे दि 21 मे रोजी मतदार होत असुन 24 मे रोजी या निवडणूकीचा निकाल लागणार आहे.

गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून, रमेश कराड यांना विधानपरिषदेचं तिकीटही दिलं होतं.मात्र आता त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. आता कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.पंकजा मुंडे यांच्या पाठींब्यामुळे या निवडणुकीत धस याचं पारडे जड आहे.