अशोक कांबळेच आरपीआयचे अधिकृत शहराध्यक्ष : रामदास आठवले

Ramdas Athavale & RPI

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शहराध्यक्षपदी लोकशाही पद्धतीने निवडुन आलेले माजी नगरसेवक अशोक कांबळे हेच पुण्याचे अधिकृत शहराध्यक्ष असतील, अशी घोषणा सोमवारी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली व आरपीआयमधील गैरसमजांना पूर्णविराम दिला.

नुकत्याच झालेल्या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले अशोक कांबळे आणि शिष्टमंडळाने सोमवारी रामदास आठवले यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आठवले यांनी अशोक कांबळे हेच अधिकृत पुणे शहर अध्यक्ष असल्याची घोषणा केली. यावेळी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआयचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, माजी नगरसेवक आयुब शेख, संतोष लांडगे, ॲड. मंदार जोशी, मोहन जगताप, माहिपाल वाघमारे, संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, सुनील बनसोडे, वसंत बनसोडे, महेश कुरणे, ॲड. मुकेश बी. शहारे, किरण भालेराव, महादेव साळवे, विनोद टोपे, विशाल साळवे आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष निवडीवरून आरपीआयमध्ये फूट पडल्याचे समोर आले होते. लोकशाही पद्धतीने पहिल्यांदाच झालेल्या या शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे राज्यभर कौतुक झाले होते. मात्र, गटबाजी झाल्याचे कारण देत विरोधी गटाने स्वतंत्र अध्यक्षाची घोषणा केली होती. त्यांनतर निवडून आलेल्या अशोक कांबळे यांनी शिष्टमंडळासह मुंबईत पक्षाचे अध्यक्ष आठवले यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. त्यानंतर आठवले यांनी अशोक कांबळे हेच शहराध्यक्ष असतील, असे सांगितले. तसेच पक्षात गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सेना-भाजप यासंदर्भात आणखी एकदा पंतप्रधानांना आठवण करून देणार – आठवले

2 Comments

Click here to post a comment