fbpx

ज्या अशोक जगदाळेंना नाकारले त्यांनाच उमेदवार म्हणून घोषित करण्याची राष्ट्रवादीवर नामुष्की

टीम महाराष्ट्र देशा- रमेश कराड यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने, लातूर-उस्मानाबाद-बीड या मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. कारण वेळ निघून गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता उमेदवारच नाही. रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे नेते अशोक जगदाळे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवाब मलिक यांनी ट्वीट करून दिली आहे.

रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी मागे घेतली आहे. काहीदिवसांपूर्वी रमेश कराड यांनी धुमधडाक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देखील दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपकडून सुरेश धस यांना उमदेवारी मिळाली होती. गोपीनाथ मुंडेंचे खंदे समर्थक असलेल्या रमेश कराड यांना राष्ट्रवादी काँग्रेसने परभणीची बाबाजानी दुर्राणी यांची जागा सोडून विधानपरिषदेचं तिकीटही दिले होते. मात्र आता कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे वांदे झाले आहेत.

कोण आहेत अशोक जगदाळे ?
अशोक जगदाळे यांचा नळदूर्गचे (उस्मानाबाद) आहेत. मुंबईत दृष्टी माध्यम समुहाच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे त्यांचा उद्योग क्षेत्रात चांगला दबदबा आहे. अभियंता असलेल्या अशोक जगदाळेंनी गेल्या सहा वर्षांपासून राजकीय व सामाजिक नळदूर्ग कामांना भागात सुरुवात केली. त्याचे फलित म्हणून नळदूर्ग पालिकेसह त्या भागातील जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत त्यांचे समर्थक विजयी झाले. मात्र, मागच्या निवडणुकीत तुळजापूर मतदार संघातून लढण्याची पूर्ण तयारी केलेल्या अशोक जगदाळे यांना भाजपने टाळले.

त्यानंतर जगदाळेंनी राष्ट्रवादीसोबत काम सुरु केले. लातूर-उस्मानाबाद-बीड मतदार संघातून राष्ट्रवादीकडून अशोक जगदाळेंचे नाव आघाडीवर होते. कदाचित ते विजयी झाले तर भविष्यात ते पवारांच्या अगदीच जवळ जातील आणि आपले बस्तान उठेल अशी भीती राष्ट्रवादीतील एका गटाला वाटली आणि जगदाळेंना पर्याय म्हणून रमेश कराड यांचे नाव पुढे केले गेले. दरम्यान, आधी विधानसभेला तुळजापूरमधून भाजपने आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीने जगदाळे यांना टाळले होते.

1 Comment

Click here to post a comment