सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की …चव्हाणांचा खळबळजनक दावा

ashok chawan

नांदेड : आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्र सारखचं असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे. आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असं वाटत नव्हतं. पण आम्ही एकत्र आलो, हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे, तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचं सरकार आलं असं विधान काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे. नांदेडमध्ये एका प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, तीन पक्षाचं तीन विचारांचे सरकार चालणार कसं? हा प्रश्न होताच पण घटनेच्या आधारावर आपलं सरकार चाललं पाहिजे ही आमची भूमिका आहे. दिल्लीतल्या आमच्या नेत्यांना भेटलो, ते म्हणाले, आम्ही बिलकुल परवानगी देणार नाही. रोज भांडणं होतील, रोज प्रश्न निर्माण होतील. सरकार चालवणार कसं? मी मुख्यमंत्री म्हणून दोन पक्षांचं सरकार चालवलं आहे. परंतु आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सांगितलं पहिलं हे लिहून घ्या की संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे.

Loading...

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, संविधानाच्या उद्देशिकेपलिकडे जाता येणार नाही आणि असं झालं तर सरकारच्या बाहेर पडायचं. एवढ्या कडक सूचना आम्हाला सरकार बनवण्यापूर्वी देण्यात आल्या. जे आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं, ते म्हणाले, काही हरकत नाही आणि त्याच्याबाहेर जाणार नाही. म्हणून घटनेच्या चौकटीत राहून सरकार चालणार आहे, अशाप्रकारची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चव्हाण यांनी एक अजब दावा केला होता. मुस्लिमांच्या आग्रहामुळे आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. नाहीतर भाजप पुन्हा पाच वर्षासाठी सत्तेत आलं असतं, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं होतं.मुस्लिम बांधवांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचं आवाहन केल्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत आलो,असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत. ते नांदेडमध्ये सीएए विरोधात आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.मग चव्हाण आता खरे बोलत आहेत कि तेव्हा खरे बोलत होते हा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात