मुस्लिमांच्या आग्रहामुळे शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली?

नांदेड : काही दिवसांपूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येत आहोत असं सांगत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले मात्र आता सत्तेत येण्यामागे नेमकी काय करणे होती याचा उलगडा होऊ लागला आहे.

मुस्लिमांच्या आग्रहामुळे आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन केलं. नाहीतर भाजप पुन्हा पाच वर्षासाठी सत्तेत आलं असतं, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.या वक्तव्याने एकाच खळबळ उडाली आहे.

Loading...

मुस्लिम बांधवांनी भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याचं आवाहन केल्यानंतर आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत आलो,असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत. ते नांदेडमध्ये सीएए विरोधात आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण ?
महाराष्ट्रात आता आमचे सरकार आहे. भाजपचे संकट आणखी पाच वर्षे महाराष्ट्रावर नको म्हणून आम्ही या सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. भाजपला रोखायचे असेल तर काँग्रेसला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी व्हावे लागेल, असे पक्षात सर्वांचे मत बनले. त्यातच अनेक मुस्लिम बांधवांनीही तसा आग्रह आमच्याकडे धरला. तो आग्रह मान्य करून आम्ही राज्यातील सरकारमध्ये सहभागी झालो. आता आमचे सरकार महाराष्ट्रात असल्याने तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. हे सरकार असेपर्यंत महाराष्ट्रात सीएए लागू होणार नाही.

दरम्यान भाजपने यामुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. चव्हाणांच्या या विधानावर शिवसेना गप्प का आहे ?, असा खोचक सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद आता कोणतं वळण घेतो हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण