fbpx

आमचा एकही आमदार भाजपच्या वाटेवर नाही, मी सर्वांच्या संपर्कात – अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे बरेचं आमदार भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आमचे कोणतेही आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत, मी सर्व आमदारांच्या संपर्कात आहे असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधान आले आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. दरम्यान कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्वतः म्हंटले आहे. तसेच विखे पाटील यांच्या सोबत आघाडीचे बरेचं आमदार तर काही नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले होते.
दरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात विचारले असता ही चर्चा निरर्थक आहे. आमचे कोणतेही आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत. काही आमदार जाणार अशा चर्चा रंगवल्या जात आहेत, पण माझी सर्व आमदारांशी चर्चा झाली आहे. आमचे कोणतेही आमदार त्यांच्या गळाला लागणार नाहीत. असे त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, औरंगाबादचे आमदार अब्दुल सतार यांच्याविषयी विचारले असता, त्यांचा विषय वेगळा आहे. त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकले आहे. बाकी सर्व आमदारांशी आमचा संपर्क आहे आणि उद्या मुंबईत आम्ही काँग्रेसच्या सर्व लोकसभा उमेदवारांना बोलावले आहे. त्यांच्या पराभवाची नेमकी काय कारणे आहेत हे शोधण्यासाठी आम्ही सुरुवातीला त्यांची बैठक बोलावली आहे. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांची बैठक होईल. त्यात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असेही चव्हाण यांनी म्हंटले.