चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे- अशोक चव्हाण

ashok chawan

वेब टीम – सेना भाजपा एकत्रित नाही आले तर काँग्रेसला फायदा होईल या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे असा टोला अशोक चव्हाण यांनी लावला.

मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर काल सगळीकडे केला हे कालच्या निवडणुकीवरून दिसून आले. मोठ्या प्रमाणात EVM बंद पडले. निवडणूक निष्पक्ष आणि निर्भिड वातावरणात झाली का? या विषयी शंका आहे. काँग्रेस पक्षाचे राज्यातील नेते लवकरच दिल्लीला जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे-

  • पालघरमध्ये मतदान झाल्यनंतर EVM मशीन खासगी कारमध्ये का घेऊन गेले. ही गंभीर घटना आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणा काय करतेय. या प्रकरणाची चौकशी करावी.
  • भंडारा-गोंदियाप्रमाणेच पालघर लोकसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात EVM आणि VVPAT मशीन बंद पडल्या आणि मतदानाचा खोळंबा झाला.
  • लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही त्याठिकाणीही फेरमतदान का घेतले जात नाही? भंडारा-गोंदिया आणि पालघरसाठी वेगवेगळे नियम का?
  • EVM मशीन बाबत लोकांच्या मनात शंका आहेत. EVM चा हट्ट न धरता बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी.
  • स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या जागेसाठी होणारी निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने घेण्यापेक्षा राज्यसभेप्रमाणे खुल्या मतदान पध्दतीने घ्यावी.
  • चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा विचार करण्यापेक्षा सेना-भाजपाचेच नीट पहावे