जनतेला जुन्या चेहऱ्यांचा विट आलाय, आता नव्या चेहऱ्याना संधी दिली पाहिजे

यवतमाळ : ‘जनतेला जुन्या चेहऱ्यांचा विट आला असून ज्येष्ठांनी आता थांबले पाहिजे, त्याऐवजी तरुण नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना चिमटा काढला आहे. विदर्भातील काँग्रेसच्या मंत्र्यांचा सत्कार आणि पश्चिम विदर्भीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

निवडणुकांमध्ये सातत्याने पराभवाचा सामना करूनही पुन्हा नव्याने उमेदवारीसाठी धडपड करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या भाषणामधून आम्ही तुमच्या सोबत आहोत याचा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. भाषणांमधून कुणी व्यथा मांडली तर कुणी पक्षाला नवी दिशा दिली. मात्र अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या तमाम नेत्यांचा यावेळी समाचार घेतला.

Loading...

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले कि, एकेकाळी यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांमध्ये केवळ काँग्रेसच निवडून येत होती, आमच्या नांदेड जिल्ह्यातील ही पत राखली, मात्र यवतमाळला गेल्या काही निवडणुकांमध्ये ही पत राखता न आल्याने काँग्रेसचा हा बालेकिल्ला नेस्तनाबूत झाला. यामागील कारणे शोधले असता वर्षानुवर्षे एकाच व्यक्तीला संधी देणे, तिकीट दिल्यामुळे हि परिस्थिती ओढवली आहे. अशी बाब समोर आल्याचे सांगितले.

तसेच जनतेलाही या जुन्या चेहऱ्याचा विट आला आहे, हे चेहरे नकोसे झाले आहेत, येत्या काळात पक्षाने यात बदल न केल्यास पक्षाची स्थिती सुधारेल असे वाटत नाही, त्यामुळे आता ज्येष्ठ नेत्यांनीही काहीशी उसंत घेऊन आता थांबले पाहिजे, नव्या चेहऱ्यांना पक्षाने संधी दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका