जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादीकडून कोणताच प्रस्ताव नाही – अशोक चव्हाण

congress state president ashok chavan

टीम महाराष्ट्र देशा : भाजपा विरोधात सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनासोबत घेऊन निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेसने देशपातळीवर सुरू केली आहे. आघाडीसंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आलेला नाही. यासंदर्भात त्या पक्षाच्या नेत्यांशी कोणतीही औपचारिक चर्चा सुद्धा झालेली नसल्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपाकडून स्थापना दिवसावर ५० कोटी रुपये खर्च- अशोक चव्हाण

लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील आघाडीसाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला समसमान म्हणजे 50-50 टक्केचा प्रस्ताव दिल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून यास दुजोरा दिला जात आहे. मात्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन पक्षांत आघाडीबाबत एकमत झाले आहे. अद्याप जागा वाटपाबाबत कोणतीही अधिकृत बैठक झालेली नाही किंवा कुणी कुणाला त्यासाठी प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट केले.

शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्यानेच भाजपासोबत पापाची वाटेकरी- अशोक चव्हाण