‘शत्रूचा शत्रू… तो आपला मित्र’ ; कोल्हापुरात चव्हाण- शेट्टी भेट

टीम महाराष्ट्र देशा – ‘शत्रूचा शत्रू… तो आपला मित्र’ या नात्याने आज कोल्हापुरात वेगळीच राजकीय खलबत पाहिला मिळाली .काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन भेट  घेतली. अशोक चव्हाण व राजू शेट्टी यांच्या  भेटीकडे पाहिले जात आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली, असं सांगितलं जातंय

२०१४ च्या निवडणुकीत भाजपा आघाडीत सहभागी झालेल्या राजू शेट्टी यांनी आता भाजपाशी फारकत घेतली असून ते शेतकर्यांच्या प्रश्नावर सरकार विरोधात आक्रमक आहेत.तर दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन केले आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीमुळे हे दोन्ही पक्ष शेतकर्यांच्या प्रश्नावर एकत्र येऊन सरकारविरोधात आघाडी उघडतील की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

शेतकरी  प्रश्नावरून राजू शेट्टी व अशोक चव्हाण एकत्र आले असले तरी नवीन राजकीय समीकरणाची जुळवाजुळव होत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

 

IMP