कॉंग्रेसमध्ये भूकंप : राहुल गांधींसह अशोक चव्हाणही राजीनामा देण्याच्या तयारीत ?

टीम महाराष्ट्र देशा :२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच राज्यासह देशातही कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रतील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे कॉंग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे. जर अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील कॉंग्रेसची धुरा कोण सांभाळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, देशात काँग्रेसला फक्त ५२ जागा जिंकता आल्या आहेत तर बहुतांशी राज्यात काँग्रेसला भोपळा देखील फोडता आला नाही. महाराष्ट्रात कॉंग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.