नाही नाही म्हणत अखेर अशोक चव्हाण यांनाच नांदेडमधून उमेदवारी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेसाठी कॉंग्रेसने आपली आठवी यादी आज जाहीर केली यात एकून ३८ उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील फक्त एकाच म्हणजे अशोक चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. यावेळी नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या नावाची घोषणा झाल्याने त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

अशोक चव्हाण यांची राज्याच्या राजकारणात परतण्याची इच्छा होती. त्यामुळे नांदेडची उमेदवारी पत्नी अमिता चव्हाण यांना मिळावी अशी मागणी त्यांनी कॉंग्रेस हायकमांडकडे केली होती. परंतु कॉंग्रेसने अशोक चव्हाण यांनाच नांदेडमधून लढण्याचे आदेश दिले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे फ़क़्त दोनच खासदार निवडून आहे होते त्यात अशोक चव्हाण यांचा समावेश होता. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला आहे.