भाजप बरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच नाही ; गद्दार गावितांना कसे निवडून आणणार – अशोक चव्हाण

मुंबई : पलूस आणि कडेगाव निवडणुकीबाबत भाजप बरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. राजेंद्र गावित यांनी कॉंग्रेस पक्षासोबत गद्दारी  केली आहे त्यांना कसं निवडून आणणार अस वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल आहे. राजेंद्र गावित यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे अर्ज भरला आहे.

तर शिवसेनेने चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्यानं अडचणीत सापडलेल्या भाजपानं थेट काँग्रेसकडे पाठिंबा मागितला होता. पालघरमध्ये पाठिंबा द्या आणि पलूसमध्ये पाठिंबा घ्या, अशी ऑफर भाजपाकडून काँग्रेसला देण्यात आली होती, मात्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपची ही ऑफर फेटाळून लावत भाजप बरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही अस स्पष्ट केलय.

दरम्यान, माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी विश्वजीत कदम यांच्याविरोधात फक्त भाजपने उमेदवार दिला आहे तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कॉंग्रेसला पाठींबा दिला आहे.

You might also like
Comments
Loading...