भाजपला सत्तेतून उलथून टाकणे तितके सोपे नाही – अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा :  केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारविरोधात जनतेचे मत परिवर्तन होत असले तरी भाजपला सत्तेतून उलथून टाकणे तितके सोपे नाही. तरीही भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

Loading...

आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी काँग्रेसकडून ‘व्हिजन – २०१९’ या कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लातुरात पार पडलेल्या या शिबिराप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी राज्यमंत्री दिलीप देशमुख, आमदार अमित देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...