आता ‘बीजेपी से बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आली आहे – अशोक चव्हाण

अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र आणि बहुतांश राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे ‘बीजेपी से बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आली असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

देशात बलात्कारच्या घटनात वाढ झाली असून, ही अतिशय गंभीर बाब आहे. पंतप्रधानांना यावर प्रतिक्रिया देण्यास जवळपास ११ ते १२ दिवस लागले. मुलींच्या लैंगिक शोषणाच्या विविध घटनांत भाजपचे पदाधिकारी आमदारच गुंतलेले आहेत. यामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ यापेक्षा ‘बीजेपी से बेटी बचाओ’ असे म्हणण्याची वेळ सामान्य माणसावर आलेली आहे, असा टोला चव्हाण यांनी लगावला.