पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही,अशोक चव्हाणांची मोठी घोषणा

अकोट : मागील  विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना यावेळी थांबण्याचा सल्ला देऊन नवीन उमेदवारांना संधी देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी अकोट येथे केली.काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान स्थानिक खरेदी-विक्री मैदानात सभा पार पडली. त्यावेळी चव्हाण बोलत होते.

आगामी निवडणुकांमधील रणनीती संदर्भात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, की केंद्रात व राज्यात भाजप-सेनेचे सरकार आहे. या सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. जनतेची फसवणूक केली. या सरकारला शेतकरी, युवक, व्यापारी सर्वच कंटाळले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांना एकत्र आणून सत्ता स्थापन करणार, सहा महिन्यांनंतर आपलेच सरकार येईल.

You might also like
Comments
Loading...