fbpx

अशोक चव्हाण,वाड्रा, चिदंबरम हे भ्रष्टाचारात गुरफटलेले आहेत : आंबेडकर

लातूर- महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याची घोषणा केल्यानंतर आता भारिप बहुसंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे अनेक नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले असल्याची टीका केली आहे.

काँग्रेसची महाराष्ट्रात अजिबात ताकद राहिलेली नसून काँग्रेसकडे चांगला चेहराच नसल्याची टीका आंबेडकर यांनी केली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात काँग्रेसकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारही नाहीत. रॉबर्ट वड्रा, चिदंबरम हे भ्रष्टाचारात गुरफटलेले आहेत. अशोक चव्हाणही त्याच प्रकारातील नेते आहेत. काँग्रेसनं मुकाट्यानं आम्हाला पाठिंबा द्यावा, काँग्रेस कोणत्याही अटी आणि शर्थी ठेवण्याच्या स्थितीत नाही असं देखील ते म्हणाले.