‘अशोक चव्हाण, ठाकरेंनी मराठा समाजाचा घात केला, आता आम्ही शांत बसणार नाही’

जालना : ‘गेल्या ३९ वर्षांपासून मराठा समाज झगडत आहे. आज सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाच्या विरोधात जो निकाल लागला आहे. त्याला फक्त आणि फक्त अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. त्यांनीच मराठ्यांचा घात केला आहे. आमची बाजू मांडण्यात ते कमी पडले. मात्र आता आम्ही शांत बसणार नाही रस्त्यावर उतरून लढा उभारण्याची वेळ आली आहे. १५ दिवसात अध्यादेश काढा, अन्यथा ठाकरे सरकारमधील कुठल्याही नेत्याला रस्त्यावर फिरु देणार नाही’. असा सष्ट इशारा साष्टपिंपळगाव आंदोलकांनी दिला आहे. मराठा आरक्षणावर सुप्रिम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आंदोलन मनोज सरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगाव मधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. २५ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास वचन दिले होते की येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या मागण्यांना मंजूरी देऊ. मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून ग्रामस्थांची कुठलीही विचारपूस करण्यात आलेली नाही. आज मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या ४ महिन्यांपासून शांततेत लढा देणाऱ्या साष्टपिंपळगाव ग्रामस्थांमध्ये यामुळे तीव्र असंतोष पसरला आहे. गुरुवारी (दि.४) राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यात येईल.

अशोक चव्हाण, मुख्यमंत्री ठाकरेंनी रस्त्यावर फिरुन दाखवावे :  मराठा समाजाची राज्य सरकारने मोठी फसवणूक केली आहे. आम्हांला आत्तापर्यंत फक्त खोटी आश्वासने देण्यात आली. अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच सरकारमधील कुठल्याही नेत्याला आम्ही १५ दिवसांनंतर रस्त्यावर फिरु देणार नाही. अध्यादेश काढा अन्यथा यांची गय करणार नाही. आत्तापर्यंत आम्ही संपूर्ण गावकरी शांततेने लढा देत होतो. मात्र आता रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे. आमचे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा  इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या