नांदेड लोकसभा : अशोक चव्हाण यांनी भरला उमेदवारी अर्ज

टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. तसेच आता प्रत्येक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत भरू लागला आहे. त्याचप्रमाणे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज नांदेड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

दरम्यान अशोक चव्हाण हे लोकसभेसाठी इच्छुक नव्हते, नांदेडच्या जागेसाठी त्यांनी पत्नी अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु कॉंग्रेस हायकमांडकडून आदेश आल्याने त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

२०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला होता. त्यावेळी महाराष्ट्रातून फक्त दोनच खासदार निवडून आले होते. त्यात अशोक चव्हाण यांचा समावेश होता. राज्याच्या राजकारणात परत येण्याची त्यांची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी पत्नी अमिता यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते.