fbpx

‘RSSच्या इतिहासात भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाच्या विरोधाबाबतचे धडे ही विद्यार्थ्यांना द्यावेत’

टीम महाराष्ट्र देशा : नागपूर विद्यापीठा कडून बी. ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. अभ्यासक्रमातील एक बदल धक्कादायक आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर यावरून कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर विद्यापीठ बीए भाग-२ च्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रनिर्माणातील भूमिका’ शिकवली जाणार आहे. त्यामध्ये आरएसएसने १९४२ च्या चलेजाव आंदोलनाला केलेला विरोध, भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाला केलेला विरोधही विद्यार्थ्यांना सांगावा, अशी आमची मागणी आहे, असे अशोक चव्हाण यांनी ट्विट केले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)च्या इतिहासाचा समावेश केला आहे. 1885 ते 1974 या कालखंडात भारताचा इतिहास या भागाचा समावेश आहे. हा भाग शिकवताना संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देखील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.
दरम्यान आतापर्यंत कोणत्याच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आरआरएसच्या इतिहासाचे धडे दिले गेले नाहीत. मात्र नागपूर विद्यापीठाने अभ्यासक्रमात आरएसएसच्या इतिहासाचे धडे घेतल्याने महाराष्ट्रातील नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.