अब्दुल सत्तारांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी, विखे पाटलांचा निर्णयही लवकरच – चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा: बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भोकरदनमधील जाहीर सभेत हि घोषणा केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बद्दल देखील पक्षतश्रेष्ठी लवकर निर्णय घेणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितले आहे.

Loading...

जालना लोकसभेचा उमेदवार ठरवताना सत्तार यांना विश्वासात घेण्यात आले होते, पक्षाने त्यांना देखील उमेदवारी देऊ केली होती, मात्र त्यांनी नकार दिला. जालन्यात एक भूमिका अन् औरंगाबादेत एक भूमिका असं चालणार नसल्याचं अशोक चव्हाण यांनी सभेत सांगितले आहे.तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत देखील चव्हाणांनी भाष्य केले. ते म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेणार आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठी राहुल गांधी यांना अवगत करण्यात आले असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसचा हात सोडला. तर नगर मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने म्हणजेच सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी पदरात पाडून घेतली. परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांनी अद्याप भाजप प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र अशोक चव्हाण यांच्या भोकरदनमधील सभेतल्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या देखील हातात कॉंग्रेस पक्ष नारळ ठेवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.Loading…


Loading…

Loading...