शिवसेनेबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा :  नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री अशोक चव्हाण यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात गौप्यस्फोट केला होता. तीन पक्षांच्या सरकारला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा विरोध होता. शिवसेनेने घटनेनुसार काम करावे, असे आम्ही त्यांच्याकडून लिहून घेतले आहे. जर शिवसेनेने घटनेनुसार काम केले नाही तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असे वक्तव्य केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

चव्हाण यांच्या या मुक्ताफलांमुळे ते चौफेर टीकेचे धनी बनले आहेत. आता त्यांनी सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. मी तीनही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाबाबत बोललो होतो. तीनही पक्षांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम तयार केला आहे. तो लिखित दस्तावेज आहे. मी जे बोललो ते त्याअनुषंगाने होते. मात्र त्या विधानाबाबत ज्या बातम्या आल्या, ती वस्तुस्थिती नाही. मी कोणाच्याही विरोधात बोललेलो नाही. आमचे सरकार उत्तम चालले आहे. हम साथ साथ है असं म्हणत चव्हाण यांनी सारवासारव केली आहे.

Loading...

दरम्यान, चव्हाण यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. चव्हाणांच्या लिखीत स्वरुपाच्या वक्तव्याचं एकनाथ शिंदेंनी खंडन केलंय. अशोक चव्हाणांच्या विधानानंतर, संविधानाच्या चौकटीतून सरकार चालवण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत आणि तसंच सरकार चालणार आहे. किमान समान कार्यक्रमाशिवाय काहीही लिहून देण्यात आलेलं नाही, असेही शिंदेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले आहे. त्यामुळे कोणीही कुणाकडून काहीही लिहून घेतलेले नाही. तिन्ही पक्षांनी म्हणजेच, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी मिळून किमान समान कार्यक्रमासाठी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कालची बोलण्याची पद्धत चुकली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात