नांदेड: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. अनेक नद्या, नाले यांना पूर आलेले आहेत. तसेच बऱ्याच भागातील धरणे भरल्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा फटका बसत आहे. अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने मदत द्या अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.
“पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. नांदेड जिल्हात काही जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच २ व्यक्तींचे मृत्यू देखील झाले आहेत. आता पंचनामे करण्यावर मर्यादा आहेत, याची जाणीव आहे. परंतु पाऊस ओसरल्यावर तातडीने पंचनामे झाले पाहिजेत आणि मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना नियमाप्रमाणे मदत दिली गेली पाहिजे”, असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Maharashtra Cabinet : शिंदे, फडणवीसांची सावध भूमिका, 19 तारखेला दोन्ही बाजूचे प्रत्येकी 4 मंत्रीच शपथ घेणार?
- Sanjay Raut | शिवसेना अशा अनेक प्रसंगांतून बाहेर पडली आहे – संजय राऊत
- Uddhav Thackeray : लढाईला तयार राहा, शिवसेना मजबूत हे दाखवून द्या; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
- Sadabhau Khot | “…मंत्री मंडळात वाडप्यांची गरज नाही” – सदाभाऊ खोत
- India vs England, 2nd ODI | रोहित शर्माने टॉस जिंकला, भारत करेल प्रथम गोलंदाजी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<