निष्ठावान व समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड ! – अशोक चव्हाण

ashok-chavhan

मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावान व समर्पित नेता गमावला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

गुरुदास कामत यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, कामत आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, राजस्थान व गुजरातचे प्रभारी अशा विविध पदांवर कार्यरत असताना काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचे काम त्यांनी केले.

चार वेळा खासदार व केंद्रीय मंत्री म्हणून मुंबई शहराच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते कुशल संघटक व अभ्यासू नेते होते. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
गुरुदास कामत यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून काँग्रेस पक्ष कामत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

वाचा का मानले सोनिया गांधी यांनी नितीन गडकरी यांचे आभार