सनातनला मिळत असलेला राजाश्रय देशाला घातक : अशोक चव्हाण

पुणे : पाच वर्षांपूर्वी सनातन संस्थेवर बंदी आणावी असा प्रस्ताव मी अभ्यास करून केंद्राला पाठवला होता. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न होता कर्नाटक आणि महाराष्ट्रात या संस्थेला राजाश्रय मिळत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुण्यात केला आहे. पुण्यात काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण ?

कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्याची प्रक्रिया असते. मात्र सनातनसाठीच्या प्रक्रियेला विलंब झाला असून यात कोणती तरी फार मोठी गुप्तचर संघटना यात दिसत असल्याची शंका आहे. सनातनला मिळत असलेला राजाश्रय देशाला घातक आहे. डॉ दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. यात सरकारने विनाहस्तक्षेप तपास करावा .

दरम्यान, नालासोपारा येथून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह तिघांविरोधात कारवाई करणा-या एटीएसच्या अधिका-यांना संरक्षण देण्याची मागणी आमदार अबु आझमी यांनी केली आहे. सरकारसह एटीएसने केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र हा कट स्वातंत्र्यदिनासाठी नसून बकरी ईदसाठी करण्यात आल्याचा आरोपही आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आझमी यांनी केला आहे. सरकारने अभिनव भारत आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आमदार अबु आझमी दिली आहे.

मोदींचे अनुकरण करत इम्रान खान यांनी दिला ‘स्वच्छ पाकिस्तान’चा नारा

 

You might also like
Comments
Loading...