सनातन संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा – अशोक चव्हाण

मुंबई : पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने काल छापा मारला होता . या छाप्यामध्ये तब्बल २० देशी बॉम्ब आणि २ जिलेटीन सापडले होते. या प्रकरणी संशयित आरोपी वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान अनेक हिंसक कारवायात गुंतलेल्या सनातन संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, सनातन संस्थेच्या एका साधकाच्या घरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. यावरून सनातन संस्था मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट आहे. या अगोदरही बॉम्बस्फोट आणि विचारवंतांच्या हत्येप्रकरणात वेळोवेळी सनातनशी संबंधित लोकांचा हात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावी.

Rohan Deshmukh

गणेशोत्सवाच्या मंडप उभारणीवरून राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

गोमांस खाणारे नेहरू हे पंडित असूचं शकत नाही; भाजप आमदाराची मुक्ताफळे

Latur Advt
You might also like
Comments
Loading...