अशोक चव्हाण यांच्या पहिल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद

टीम महाराष्ट्र देशा : मंत्रालयातील प्रचंड गर्दीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सुरू केलेल्या ‘लोकदरबार’ला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन आपली निवेदने सादर केली.
प्रारंभी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी अशोक चव्हाण यांचे स्वागत केले.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, प्रा. प्रकाश सोनवणे, गजानन देसाई आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी सर्व अभ्यागतांच्या भेटी घेऊन निवेदने स्वीकारली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पहिल्या ‘लोकदरबार’मध्ये एकूण ९० निवेदने प्राप्त झाली असून, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

Loading...

मंगळवारी आणि बुधवारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक मंत्रालयात येतात. मात्र, मंत्रालय प्रवेशासाठी मोठी गर्दी होत असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्यातही एखादी शासकीय बैठक लागल्यास मंत्र्यांना त्यासाठी जावे लागते व लोकांचा अधिक वेळ खर्ची पडतो. ही अडचण दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दर बुधवारी दुपारी ३ वाजता प्रदेश काँग्रेसचे कार्यालय गांधी भवन, रिगल सर्कलजवळ, मॅजेस्टिक आमदार निवासच्या मागे, कुलाबा, मुंबई येथे उपस्थित राहून नागरिकांना भेटण्याचा निर्णय घेतला आहे.

या माध्यमातून लोकांना निवेदने देण्यासाठी निश्चित जागा व वेळ उपलब्ध झाली असून, त्यांचा वेळ आणि श्रमही वाचणार आहेत. हा उपक्रम लोकांच्या सुविधेसाठी असल्याने याला ‘लोकदरबार’ असे नाव दिल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'