भाजपच्या नेत्यापासून आपल्या मुली सुरक्षित नाहीत- अशोक चव्हाण

congress state president ashok chavan

सांगली: काँग्रेस प्रवक्ते खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप म्हणजे भारत जलोओ पार्टी असून भाजपच्या नेत्यापासून आपल्या मुली सुरक्षित नाहीत. भाजपच्या हातात देशाची सूत्रे जाणे म्हणजे हे देशाचे दुर्दैव आहे. अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसच्यावतीने महापालिका निवडणुकीसाठी मिरजेतील किसान चौकात आयोजित सभेत चव्हाण बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले, “शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी करत ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा मुख्यंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली. मात्र फडणवीस यांनी ते सिद्ध करून दाखवावे, आम्ही निवडणुका सोडून देऊ” केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदरं अशी सध्याची अवस्था असल्याचे चव्हाण म्हणाले.

महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? याचे देवेंद्रजींनी उत्तर द्यावे, सांगलीत काँग्रेसचीच सत्ता राहायला हवी. काँग्रेसचे सरकार येईल आणि राहुल गांधी हे पंतप्रधान होतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.