अशोक चव्हाणांना ‘आदर्श’ दिलासा

मुंबई: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यपालांनी दिलेले सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज बेकायदेशीर ठरवले आहेत.

ऑक्टोबर 2010 मध्ये आदर्श सोसायटी घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद देखील सोडाव लागल होत. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मागील वर्षी आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाण यांची चौकशी आणि कारवाई करण्यास कारवाई करण्याची परवानगी सीबीआयला दिली होती. त्यामुळे चव्हाण यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान आता या आदेशाला उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवल्याने चव्हाण यांना मोठा दिलास मिळाला आहे.

याबद्दल बोलताना अशोक चव्हाण यांनी आपल्याला ‘न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आज संपूर्ण सत्य बाहेर आले. आदर्श घोटाळ्याचे आरोप हे आपल्याविरोधात रचलेल राजकीय षडयंत्र असल्याच म्हंटल आहे.

You might also like
Comments
Loading...