भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, मागासवर्गीयांवर अन्याय वाढले- अशोक चव्हाण

ashok chawan

मुंबई: जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या दोन मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणाचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राज्य बाल हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. मुळ विषयापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राहुल गांधींना अशी नोटीस बजावण्यात आली. असल्याचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण म्हणाले, जळगावमधील त्या मुलांचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता, माध्यमांनीही तो दाखवला होता. मुळ विषयापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राहुल गांधींना अशी नोटीस बजावण्यात आली आहे.यातील कायदेशीर बाबी तपासून आम्ही आमची पुढील भूमिका स्पष्ट करू.

भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, मागासवर्गीय, गरीबांवर अन्याय वाढले आहेत, त्याचे ताजे उदाहरण जळगावमधील मुलांवरील अत्याचाराचे आहे. यावर कुठली कारवाई केली जात नाही. मग अशा गोष्टींविरोधात आवाज उठवायचा नाही का?अशा गोष्टींविरोधात आवाज उठवला, त्यात कारवाईची मागणी केली तर त्यात गैर काय आहे? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला.