शिवसेनेचा पीकविमा मोर्चा म्हणजे नुसती स्टंटबाजी : अशोक चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. बुधवारी 17 जुलैला शिवसेनेना पिकविमा कंपन्यांविरोधात इशारा मोर्चा काढणार आहे. पिकविमा कंपन्यांविरोधात शिवसेना वांद्रे कुर्ला संकुलात इशारा मोर्चा काढणार आहे. शेतकऱ्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तर शिवसेनेच्या या मोर्चाबाबत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी खिल्ली उडवली आहे.
सरकार म्हणून कर्तव्य बजावण्यात शिवसेना साफ अपयशी ठरली आहे. सरकार म्हणून ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकलेले नाहीत. हे अपयश झाकण्यासाठीच आता ते विमा कंपन्यांवर मोर्चे काढण्याचा ‘स्टंट’ करीत असल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. तर मोर्चा काढून काहीही होणार नाही. त्याऐवजी शासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णय घेऊन कंपन्यांना भरपाई देण्यासाठी बाध्य केले पाहिजे, असे देखील अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान या मोर्चाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, हा मोर्चा एका कंपनीवर जाईल केवळ प्रतीक म्हणून, बाकी कंपन्यांवर आमची शिष्टमंडळे जातील. तसेच जर विमा कंपन्यांना सरकारी भाषा कळत नसेल तर शिवसेना आमच्या भाषेत समजावेल. पिकविमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भातील सगळी प्रकरणे निकाली काढावीत.याचबरोबर शिवसेना सदैव आपल्यासोबत आहे हे वचन मी शेतकऱ्यांना देतो असे म्हणत शेतकऱ्यांना नडाल तर धडा शिकवल्या जाईल असा इशाराही पिकविमा कंपन्यांना ठाकरे यांनी यावेळी दिला.Loading…


Loading…

Loading...