fbpx

‘थाम के निम को, चंदन को वो ले गये, अशोक चव्हाणांची शायरीतून सरकारवर टिका

अशोक चव्हाण

सांगली : नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॉंग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षाने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसने ‘जन आक्रोश’ आंदोलनातून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, या आंदोनालाचा समारोप सांगली येथे झाला. तेव्हा महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नोटबंदी वरून मोदी सरकारला चांगलच फटकारालं.

काळा पैसा आणण्याआधी देशाचा बाहेर गेलेला पांढरा पैसा भारतात आणा, अस म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाना साधाला. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी खास शायरीच्या माध्यमातून सरकारला सुनावलं.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

‘थाम के निम को, चंदन को वो ले गये,
अपने सारे कारोबार लंडन को ओ ले गये ।
छाती ठोक कर जो कहते है, काला धन ले आयेगे,
उनके नाक के नीचे से ओ सफेद धन भी वो ले गये।

 

2 Comments

Click here to post a comment