भाजप लोकशाहीचा गळा घोटत आहे; कर्नाटकातील स्थितीवरून अशोक चव्हाणांची टीका

टीम महाराष्ट्र देशा : सध्या कर्नाटकमध्ये एचडी कुमारस्वामी यांचं सरकार संकटात आलं आहे. कारण काँग्रेसच्या १० तर जनता दल सेक्युलरच्या तीन नाराज आमदारांनी शनिवारी विधासभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे कुमारस्वामी याचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे. या सगळ्या घटनांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपची ही कुटनीती असल्याच म्हटलं आहे.

Loading...

याबाबत बोलताना चव्हाण यांनी कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार व इतर भाजपशासीत राज्यातील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरू आहे, भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे अशी टीका केली आहे.

दरम्यान, आमदारांच्या या राजीनाम्यांमुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण कुमारस्वामींचे सरकार पडल्यानंतर भाजप इथे सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. गेल्या निवडणुकीत २२४ पैकी भाजपला १०४ , काँग्रेसला ८० आणि जेडीएसला ३७ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली होती आणि जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले होते.Loading…


Loading…

Loading...