भाजपकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, कर्नाटकच्या नाट्यावरून अशोक चव्हाण संतापले

congress state president ashok chavan

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करून कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएसचे सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र रचले आहे. भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीने कळस गाठला असून, काल ( बुधवार ) रेनिसन्स हॉटेलमध्ये जणू लोकशाहीचे वस्त्रहरणच झाले आहे. असा घणाघात कॉंग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

कर्नाटकातील काँग्रेस आमदारांचे अपहरण करून त्यांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबण्यात आले आहे. या आमदारांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते व कर्नाटकचे मंत्री डी.के. शिवकुमार मुंबईत आले. परंतु, आपल्याच पक्षाच्या आमदारांना त्यांना भेटू देण्यात आले नाही. स्वपक्षाच्या आमदारांना भेटण्यात काय गैर आहे? असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

Loading...

शिवकुमार यांचीही खोली याच हॉटेलमध्ये आरक्षित होती. पण पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये साधा प्रवेशही करू दिला नाही. राज्यातील भाजप सरकार एवढ्यावरच थांबले नाही. तर पोलीस दलाचा गैरवापर करून शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी मंत्री आ. नसीम खान यांना अटक करेपर्यंत त्यांची मजल गेली. हा सत्तेचा गैरवापर आणि लोकशाहीची गळचेपी नाही तर आणखी काय आहे? असा संताप देखील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आले आहे. पण विरोधी पक्षांची सरकारे अस्थिर करण्याचा डावच भाजप सरकारने आखल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. याआधीही गोवा व मणिपूरमध्ये असेच षडयंत्र करण्यात आले होते. आता ते अनैतिक आणि दडपशाहीच्या मार्गाने कर्नाटकचे सरकार पाडून तिथे भाजपची सत्ता स्थापन करण्याचा कुटील डाव खेळत आहेत. ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. अस अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली