अशोक चव्हाणांची अग्निपरीक्षा, राखणार का आपला गड?

धनश्री राऊत : नांदेड आणि नांदेड जिल्ह्यावर अशोक चव्हाणांच वर्चस्व होते. मात्र आता हा इतिहास झाला. पालिका आणि जेडपी जरी कॉंग्रेसच्या ताब्यात असली तरी लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांचा पराभव झाला. यामुळे नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेसची परिस्तिथी बिकट झाली आहे.

नांदेड उत्तर मतदारसंघ १० वर्षापासून कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. कॉंग्रेसचे डी.पी. सावंत हे इथले विद्यमान आमदार आहेत. शहरी भाग असलेल्या या मतदारसंघात दलित आणि मुस्लीम मत निर्णायक आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या मतांमुळे कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळला.

वंचितकडे वळालेली मते या मतदारसघांतील ही मते कॉंग्रेससाठी धोकादायक ठरणारी आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले. त्यावेळी डी.पी.सावंत यांनी ३ हजार मतांनी विजय मिळवला. मात्र आता सर्व समीकरण बदलेली आहेत.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा युतीत शिवसेनेकडे आहे. शिवसेना भाजप मध्ये युती होणार अशी चर्चा आहे. मात्र अजून काही घोषणा झाली नाही. त्यामुळे भाजपनेही इथून तयारी सुरु केली आहे. मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हा मतदारसंघ सोडणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.

उत्तर नांदेड मतदारसंघात ३ लाख १८ हजार मते आहेत. त्यात मुस्लीम मतदारांची संख्या आहे ८२ हजार. तर दलित मतदारांची संख्या आहे ४० हजार इतकी आहे. त्यामुळे या मतदार संघातून मुस्लीम उमेदवाराला तिकीट मिळण्याची मागणी एमएमआय ने केली आहे.

शिवसेना- भाजप ची युती झाली नाही तर याचा फायदा कॉंग्रेसला होईल. मात्र वंचित बहुजन आघाडी समोर आता आवाहन उभे झाले आहे. या काळामध्ये जिल्ह्याची जी राजकीय परिस्तिथी आहे. ती मोठ्या प्रमाणात बदलेली आहे. भाजपचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने सुद्धा कॉंग्रेस पुढे आवाहन उभे केले आहे. यंदाच्या या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस ही जागा राखेल की नाही या बाबत शंका उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या