Share

Ashish Shelar | “संसार तिघांचा, पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले…”; आशिष शेलारांची बोचरी टीका

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे गटाने यासाठी कंबर कसली असून शिंदे गट देखील यात मागे नाही. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मात्र ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले जात आहेत. अशातच आता भाजप नेते आशिष शेलार यांनीदेखील एका ट्विट च्या माध्यमातून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या अभूतपुर्व बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरण झपाट्याने बदलल्याचं पहायला मिळालं. गणेश दर्शनानिमित्त राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या. शिवसेनेतील फुटीचा फायदा घेत भाजपची मुंबई महापालिकेसाठीची महत्त्वकांक्षा अधिक स्पष्ट होताना दिसत आहे. अशातच आता मुंबई भाजपची कमान सांभाळणाऱ्या आशिष शेलार यांनी (Ashish Shelar) थेट उद्धव ठाकरे यांना चिमटे काढले आहेत.

भाजपचे नेते राम कदम यांनी ठाकरे सेना हि पेंग्विन सेना असल्याचं ट्विट केलं होत. आशिष शेलार यांनीदेखील अशा आशयाच्या ओळी ट्विट केल्या आहेत. काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेची साथ मिळाली असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे. “काय तो भारत जोडो , काय तो पेंग्विन सेनेचा दसरा” असं म्हणत आशिष शेलार यांनी सेनेला चिमटा काढला आहे. “सगळा गोंधळ घालून घड्याळ बघा कसे नामानिराळे , संसार तिघांचा प्रगतीचा पाळणा मात्र राष्ट्रवादीचा हले” अशा शब्दात आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर देखील हल्लाबोल केला आहे.

याआधी देखील राणीच्या बागेतील पेग्विंगवरून भाजपने माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचण्यास सुरूवात केली होती. मागील काही काळात हा मुद्दा नितेश आणि निलेश राणे यांनी लावून धरला होता. त्यानंतर आता याच शब्दांवरून भाजप शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Gulabrao Patil | “चांगल्या खात्याचा थोडा आग्रह धरला असता तर…”; गुलाबराव पाटलांची खदखद

Aadhar Card Update | घरबसल्या आधार कार्ड अपडेट करणे आहे शक्य, कसे ते जाणून घ्या!

Raj Thackeray | “…म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरा कोणी होणे नाही”; राज ठाकरेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत

Gulabrao Patil | ‘वंदे मातरम’च्या निर्णयावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; शेकडो शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे गटाने यासाठी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now