मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना मातृशोक 

shelar aashish

मुंबई : मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची आई मीनल बाबाजी शेलार यांचे रविवारी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

Loading...

त्यांच्या पश्चात आ. आशिष शेलार व भाजपा उत्तर मुंबई जिल्हा  अध्यक्ष विनोद शेलार अशी दोन मुले व एक मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे. त्यांची  अंत्ययात्रा आज संध्याकाळी 4 वाजता वांद्रे पश्चिम,येथील घरापासून निघेल. त्यांच्यावर सांताक्रूझ पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.Loading…


Loading…

Loading...