संजय राऊतांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही; शेलार कडाडले

मुंबई : काल विधानसभा-लोकसभा पोटनिवडणुकांसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशाचं लक्ष्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा एकहाती बहुमत मिळवलं असून भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरवून देखील दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.

याआधी ३ जागा असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७७ जागांवर भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, सरकार स्थापन करण्यात अपयश आल्याने भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर मार्मिक टीका केली होती. आता भाजप नेते व ऍड. आशिष शेलार यांनी राऊतांवर टीकेची तोफ डागली आहे.

‘जे स्वतः कुबड्यांवर आहेत. ज्यांचं पाहिलं पाऊल कुबड्यां शिवाय पडत नाही. त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही,’ असा घणाघात आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

महत्वाच्या बातम्या