मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना संदर्भात बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत वाढत्या कोरोना संकटावर चर्चा झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून काही राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज असल्याचे मोदींनी म्हटले. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावरूनच ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
“कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने जनतेने ‘बुस्टर डोस’ वेळीच घेतला पाहिजे. केंद्र सरकारकडून येणाऱ्या सुचना पाळल्या पाहिजेत. बाकी राज्यातील आघाडी सरकारला जो ‘डोस’ देण्याची गरज आहे त्याची तयारी आम्ही करतोय. महाराष्ट्र दिनी तिघाडीला हा ‘डोस’ मिळेलच!”, असा इशारा आशिष शेलार यांनी ट्वीट करत दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने जनतेने "बुस्टर डोस" वेळीच घेतला पाहिजे… केंद्र सरकारकडून येणाऱ्या सुचना पाळल्या पाहिजेत.
बाकी राज्यातील आघाडी सरकारला जो "डोस" देण्याची गरज आहे त्याची तयारी आम्ही करतोय.
महाराष्ट्र दिनी तिघाडीला हा "डोस" मिळेलच!
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 29, 2022
दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मास्क सक्ती पुन्हा करावी, अशी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून मागणी करण्यात येत आहे. देशात दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातही याबाबत विचार केला जातोय का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. पुन्हा मास्क सक्ती केल्यास त्याची नागरिकांमध्ये प्रतिक्रिया उमटेल. म्हणून रुग्णसंख्येचा विचार करून मास्क बाबत विचार केला जाईल. अशी माहिती समोर आली आहे. राज्यात सध्या तरी मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय झाला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर लसीकरण वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही; जालन्यातील ‘या’ गावाचा मोठा निर्णय
- मोठी बातमी! देशात कोणतीही नवी इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करण्यास केंद्र सरकारने घातली बंदी
- “…हा तर नोबेल पारितोषिकाचा विषय”, संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला चित्रा वाघ यांचा टोला
- “दिल्ली, जेएनयू, युपी सरकार पासून भीमा कोरेगाव दंगलीपर्यंत…”- संजय राऊत
- Breaking Traffic Rules : अजित पवारांनी भरला २७ हजारांचा दंड
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<